वडाची वाडी नगर रचना योजना-२
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील Inner Ring Road विकसित करण्याच्या उद्देशाने वडाचीवाडी नगर रचना योजना हाती घेण्याचे नियोजन केले आहे.
- योजनेची तयारी करण्याच्या उद्देशाने जाहीरनाम्याची घोषणा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (एमआरटीपी) च्या कलम ६०(१) अंतर्गत दिनांक १७/१२/२०१८ रोजी करण्यात आली आहे.
- वडाचीवाडीचा समावेश पीएमसी हद्दीत करण्यात आला असून या परिसरासाठी पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- जमीनमालकांना वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ६७.५० हेक्टर (५१.२०%).
- पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ३८.९८ हेक्टर (२५.०९%).
- मोकळ्या जागा, उद्यान, तलाव विकासासाठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ११.८६ हेक्टर (९.००%).
- सार्वजनिक सुविधा व उपयुक्तता यासाठी वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०६.५३ हेक्टर (४.९५%).
- विक्रीसाठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०८.८७ हेक्टर (६.७३%).
- ई.डब्ल्यू.एस. साठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ११.७२ हेक्टर (८.८९%).
- रस्त्याखालील क्षेत्रफळ: २५.३३ हेक्टर (१९.२२%).
- ११० मी. रिंग रोड: १६.६० हेक्टर (१.५१ किमी) (१२.६५%).
- १८ मी., १२ मी., ९ मी. रुंद टीपीएस रस्ते: १३.९१ हेक्टर (९.४१ किमी) (१०.६०%).
- नगर रचना योजनेचा मसुदा दिनांक ०९/०१/२०२० रोजी मंजूर करण्यात आली आहे.
- भागधारकांचे म्हणणे मध्यस्थाने ऐकून पूर्ण केले असून प्राथमिक नगर रचना योजना राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे.
| अनुक्रमांक | कागदपत्रे | डाउनलोड |
|---|---|---|
| 1 | मंजूर मसुदा आराखडे, अहवाल आणि फॉर्म-१ | डाउनलोडSize: 2.45 MB |
| 2 | प्राथमिक सादर केलेले आराखडे, अहवाल, तक्ता अ आणि ब | डाउनलोडSize: 23.0 MB |
| 3 | योजना हाती घेण्यासाठी प्राधिकरणाचा ठराव | डाउनलोडSize: 850 KB |
| 4 | योजना तयार करण्याच्या उद्देशाची घोषणा | डाउनलोडSize: 123 KB |
| 5 | मसुदा टीपीएस प्रसिद्धीसाठी राजपत्र अधिसूचना कलम ६१(१) अंतर्गत | डाउनलोडSize: 980 KB |
| 6 | मसुदा टीपीएस मंजुरीसाठी राजपत्र अधिसूचना कलम ६८(२) अंतर्गत | डाउनलोडSize: 1.24 MB |
| 7 | मध्यस्थाची नियुक्ती कलम ७२(१) अंतर्गत | डाउनलोडSize: 760 KB |
| 8 | प्राथमिक टीपीएस प्रसिद्धीसाठी राजपत्र अधिसूचना कलम ७२(५) अंतर्गत | डाउनलोडSize: 1.06 MB |
| 9 | वडाचीवाडी प्राथमिक नगर रचना योजना क्र 2 | डाउनलोडSize: 1834 KB |







