मुळा-मुठा
३) मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प – (प्राधिकरण क्षेत्रातील नदीची लांबी १०७ किमी)
पुणे महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील नद्यांचे प्रदूषण नियंत्रणासाठी आणि नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी इंद्रायणी, पवना, मुळा मुठा या नद्यांचे नदीसुधार प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. सदर प्रकल्पांना केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या National River Conservation Directorate व राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किमतीच्या ६०:४० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.
मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा पूर्व सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची कार्यवाही करण्यात येत आहे. मुळा मुठा नदी प्रदूषण नियंत्रणाकरिता अंदाजे ९७७ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.











