दक्षता विभाग
दक्षता हा विभाग विविध महत्त्वाच्या कार्यात्मक क्षेत्रांच्या देखरेखीस जबाबदार आहे, ज्यामध्ये अनधिकृत बांधकामांचे निर्मूलन व निष्कासन करणे , विविध विभागासोबत समन्वय साधून कायदयाची अंमलबजावणी करण्याकरिता कटिबद्ध असणे, सुरक्षात्मक उपाययोजना राबविणे तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) मधील कर्मचारीवर्गाच्या वर्तनावर देखरेख करणे इ. कार्यपद्धतीचा समावेश आहे . हा विभाग संस्थेच्या कार्यपद्धतीतील प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
- PMRDA मधील कर्मचारीवर्गाच्या वर्तनावर नियंत्रण व देखरेख.
- अनधिकृत बांधकामावर कारवाई आणि कायदयाच्या अंमलबजवणीसाठी समन्वय.
- सतर्कता व सुरक्षा विषयक कार्यवाही.
- आपत्तींना प्रतिसाद व समन्वय.












