पॉक्सो कोर्ट
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO)

मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे येथे पोक्सो (लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण) इमारतीचे बांधकाम.
पार्श्वभूमी
माण–हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-3 प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी प्राधिकरण आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्यात 21 सप्टेंबर 2019 सवलत करारनामा स्वाक्षांकित करण्यात आला आहे.
करारानुसार, न्यायालय परिसरातील भूखंड क्र. 776 आणि 891 मध्ये रनिंग सेक्शन, जिना आणि मेट्रो स्थानकासाठी एकूण 3,410.19 चौ.मी. क्षेत्र आवश्यक होते.
अंतिम जमीन संपादन प्रस्तावानुसार:
- जिना व स्थानकासाठी 1,150.66 चौ.मी. (स्थायी) क्षेत्र आवश्यक आहे
- मेट्रो स्तंभांच्या पायांसाठी 101.41 चौ.मी. (तात्पुरते) क्षेत्र आवश्यक आहे
12 एप्रिल 2023 रोजी मा. न्यायालयाने तात्पुरते क्षेत्र (101.41 चौ.मी.) प्राधिकरणाला उपलब्ध करून दिले असून काम पूर्ण झाले आहे. तसेच, कायमस्वरूपी क्षेत्र (1,150.66 चौ.मी.) संदर्भात, मा. उच्च न्यायालय इमारत समिती, मुंबई यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 11 जानेवारी 2024 रोजी जिल्हा न्यायालय आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्यात करार स्वाक्षांकित करण्यात आला. जमीन हस्तातरण बदल्यात प्राधिकरण मार्फत पोक्सो (G+4) इमारत बांधेल आणि न्यायालय परिसराचे सुशोभीकरण करेल.
इमारतीच्या तपशील
- रचना: आरसीसी G+4 फ्रेम्ड स्ट्रक्चर
- एकूण बांधकाम क्षेत्र: 2,035.45 चौ.मी. (जो ते क्षेत्रफळ – 407.09 चौ.मी.)
- एकूण उंची: 19.20 मीटर
- जिने: 2
- लिफ्ट: 2
- डिझाइन सौंदर्य: नवीन न्यायालयीन इमारतीशी सुसंगत वारसा शैली (Heritage look)
मजल्यांनुसार सुविधा
भूतळ
- व्हिडिओ रेकॉर्डिंग / परिषद कक्ष
- समुपदेशन कक्ष
- साक्षीदार तयारी कक्ष
- फूड काउंटर
- अभिलेख कक्ष
पहिला व दुसरा मजला
- 4 न्यायालय सभागृहे
- न्यायाधीशांचे कक्ष
- न्यायालयीन कार्यालय
- अभिलेख कक्ष व स्वच्छतागृहे
तिसरा व चौथा मजला
- 2 पोक्सो न्यायालय सभागृहे
- न्यायाधीशांचे कक्ष
- न्यायालयीन कार्यालय
- जबाब नोंद कक्ष
- प्रतीक्षालय
- अभिलेख कक्ष व स्वच्छतागृहे
अतिरिक्त वैशिष्ट्ये
- वातानुकूलन प्रणाली
- सौर ऊर्जा प्रणाली
- भूमिगत व ओव्हरहेड जलटाक्या
- बागेचे सुशोभीकरण
सद्य बांधकाम स्थिती
- R.C.C काम ९५% पूर्ण झाले आहे.
- १% आणि दुसरा मजला – विटांचे काम
- विट बांधकाम, जिप्सम प्लास्टर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पूर्ण व तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर प्रगतीत.
- इमारत बांधकामाची अंतर्गत कामे प्रगतीत आहे. (फ्लोअरिंग, दरवाजे खिडक्या फ्रेम)
- प्रकल्पाची प्रशासकीय किंमत रु. १६.९३ कोटी.
- कंत्राटदाराचे नाव : मे टाटा प्रोजेक्ट्स लि.
- कामाची मुदत : १८ महिने (मुदतवाढ प्रस्तावित)
- कार्यारंभ आदेश: ०४/०१/२०२४
- भौतिक प्रगती : ४५%
- आर्थिक साध्य : १५%









