बहुविध वाहतूक केंद्र
पीएमआरडीए क्षेत्रातील आंतर रिंग रोडलगत बहुविध वाहतूक केंद्रांचा विकास

- पीएमआरडीए क्षेत्रात एकूण 13 बहुविध वाहतूक केंद्रांचा प्रस्ताव आहे. त्यापैकी आंतर रिंग रोडलगत असलेल्या 5 बहुविध वाहतूक केंद्रांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे.
- या 5 केंद्रांसाठी अंदाजे ₹370.13 कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता पीएमआरडीए सभाक्र. 11 दिनांक 24/09/2024 द्वारे प्राप्त झाली आहे.
| अनुक्रमांक | स्थान | क्षेत्रफळ (हेक्टरमध्ये) | मालकी |
|---|---|---|---|
| 1 | भुगाव, मुळशी | 1.24 हे. | खाजगी |
| 2 | भिलारेवाडी, हवेली | 1.60 हे. | खाजगी |
| 3 | कदमवाकवस्ती, हवेली | 5.02 हे. | खाजगी |
| 4 | सोलू, हवेली | 5.51 हे. | खाजगी |
| 5 | वाघोली, हवेली | 9.08 हे. | शासकीय आणि खाजगी |











