म्हाळुंगे – माण नगर रचना योजना-१
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी म्हाळुंगे आणि माण, ता. मुळशी येथे पहिली नगररचना (TP) योजना विकसित करण्याचे नियोजन केले आहे.
- योजना तयार करण्याच्या हेतूची घोषणा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 (MRTP) मधील कलम 60(1) अन्वये दिनांक 05/08/2017 रोजी करण्यात आली आहे.
- म्हाळुंगे – माण प्राथमिक TPS ला राज्य सरकारने कलम 86(1) अंतर्गत मंजुरी दिली असून ती अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.
- निळ्या व लाल पूररेषेत झालेल्या बदलांमुळे, त्यानुसार योजनेतील पुढील बदल (Subsequent Variation) करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- म्हाळुंगे – माण हा परिसर PMC हद्दीत समाविष्ट करण्यात आला असून या क्षेत्रासाठी PMRDA यांना विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- जमिनमालकांना वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: १२०.१४ हेक्टर
- PMRDA ला वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ७४.१८४ हेक्टर
- मुक्त जागा, उद्यान, तलाव विकासासाठी PMRDA ला वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: २३.३५ हेक्टर
- सार्वजनिक सुविधा आणि युटिलिटीजसाठी वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: १४.७९ हेक्टर
- विक्रीसाठी PMRDA ला वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: १४.७३ हेक्टर
- EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) साठी PMRDA ला वितरित अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: २१.३१४ हेक्टर
- रस्त्यांखालील क्षेत्रफळ: ४९.९५ हेक्टर
- नाला: ०६.२३ हेक्टर
- अंतिम भूखंडाचा FSI = मूळ भूखंडाचे क्षेत्रफळ / अंतिम भूखंडाचे क्षेत्रफळ × १.२५
- प्राथमिक नगर रचना योजना दि ०२/१२/२०१९ रोजी मंजूर आहे.
- प्रथम फेरबदलाची कार्यवाही सुरु असून, फेरबदलाची प्रारूप योजना अधिनियमाच्या कलम ६८(२) नुसार दि.३०/१२/२०२२ रोजी मंजूर आहे.
- शासनामार्फत नियुक्त लवाद यांनी दि ०४/०१/२०२४ रोजीच्या पत्रान्वये प्राथमिक नगर रचना योजना मान्यतेसाठी सादर केलेली आहे











