दृष्टीकोन व ध्येय
पुणे महानगर प्रदेशाचे आर्थिक विकास, नवोन्मेष आणि समुदाय कल्याण यांना चालना देणारे शाश्वत सर्वसमावेशक आणि सशक्त केंद्र म्हणून रुपांतरण करणे, जिथे नागरीकांची प्रगती आणि उद्योग-व्यवसायांची वाढ साधली जाईल तसेच प्रदेशाचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक पर्यावरण यांचे प्रभावीपणे जतन केले जाईल.
पीएमआरडीए हे नागरिकांसाठी उत्कृष्ट जीवनसुविधा आणि जागतिक गुंतवणूकदारांसाठी उत्तम आर्थिक संधी उपलब्ध करून देणारे भविष्य घडविण्यास वचनबद्ध आहे. आमच्या दृष्टीपूर्तीसाठी आमचे ध्येय पुढीलप्रमाणे आहे:
- नियोजित वाढ सुलभ करणे: शाश्वत नागरी विकासाला पाठबळ देणारी पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा विकसित करणे.
- व्यवसाय सुलभता: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी व्यवसायाचे अनुकूल वातावरण निर्माण करून आर्थिक विकास आणि गुंतवणूक प्रोत्साहित करणे.
- भविष्योन्मुख प्रशासन: तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांवर आधारित प्रशासन प्रणाली अंमलात आणणे.
- हरित नवोन्मेष: हरित नवोन्मेष, ई-व्यवस्थापन आणि डिजिटल माहिती प्रसारणाच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करणे.
- शाश्वत रोजगार: सर्वांसाठी समावेशक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या रोजगार व संपत्ती निर्मितीच्या संधी निर्माण करणे.
- संस्कृती आणि वारसा: पीएमआरच्या परिसंस्थेत स्थानिक संस्कृती आणि वारसा यांचा समावेश करून त्याची वैशिष्ट्यपूर्ण ओळख जपणे.
- उच्च आनंद निर्देशांक: नागरिकांच्या कल्याण आणि समाधानाला प्राधान्य देऊन उच्च जीवनमान आणि आनंदी जीवनशैलीला प्रोत्साहन देणे.
पुणे महानगर प्रदेशातील पर्यावरण संरक्षण, संसाधन संवर्धन आणि हरित विकासाला चालना देत शाश्वत नागरी वाढीसाठी पीएमआरडीए वचनबद्ध आहे.











