मलनिस्सारण प्रणाली
४) पु.म.प्र.वि.प्रा. पुणे क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात विविध ठिकाणी मल:निसारण प्रकल्प करणे.
उपरोक्त योजनेसाठी प्राधिकरण सभा दि. २४/०९/२०२४ ठराव क्र. ११/९ अन्वये रु. ३०० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्यात आलेले आहे.
सल्लागारामार्फत लोकसंख्येच्या घनतेनुसार १ लक्ष ते ५ लक्ष पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांचे प्रत्येकी २ ते ३ असे एकूण ५ तालुक्यातील १३ क्लस्टर करण्यात आले असून त्यामध्ये २७ गावांचा समावेश आहे.
मलनि:स्सारण प्रकल्पांची यादी
| अ.क्र. | कामाचे नाव | प्रकल्प किंमत (कोटी) |
|---|---|---|
| १. | मुळशी तालुक्यातील ३ क्लस्टर मधील ६ गावांकरीता मलनि:स्सारण प्रकल्प राबविणे. | ३०४.०० |
| २. | हवेली तालुक्यातील ५ क्लस्टर मधील ८ गावांकरीता मलनि:स्सारण प्रकल्प राबविणे. | ४०७.९५ |
| ३. | शिरुर तालुक्यातील ४ क्लस्टर मधील ४ गावांकरीता मलनि:स्सारण प्रकल्प राबविणे. | ३१२.७० |
| ४. | खेड तालुक्यातील ३ क्लस्टर मधील ७ गावांकरीता मलनि:स्सारण प्रकल्प राबविणे. | १८०.१३ |
| ५. | मावळ तालुक्यातील १ क्लस्टर मधील २ गावांकरीता मलनि:स्सारण प्रकल्प राबविणे. | ४.३० |
उपरोक्त सविस्तर प्रकल्प अहवालाची एकूण किंमत रु.१२०९.०८ कोटी इतकी येत असून दि.११/१२/२०२४ रोजी मा. प्राधिकरण सभेपुढे मंजूरीसाठी सादर असून निविदा प्रसिद्ध करणेत आली आहे.
प्रस्तावित प्रकल्पात खालील क्षेत्रांचा समावेश असेल
- चाकण आणि आसपासची गावे
- आळंदी आणि आसपासची गावे
- वाघोली, केसनंद आणि आसपासची गावे
- भुगाव, भुकूम आणि आसपासची गावे
- खेड, राजगुरुनगर आणि आसपासची गावे
- शिक्रापूर आणि आसपासची गावे
- उरुळी कांचन आणि आसपासची गावे
- खेड शिवापूर, नसरापूर आणि आसपासची गावे
प्रभावी नियोजन सुनिश्चित करण्यासाठी, या गावांसाठी मलनिस्सारण पायाभूत सुविधांचा समावेश असलेले सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरिता प्राधिकरण सल्लागार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत आहे.











