पवना
१) पवना नदी सुधार प्रकल्प – (प्राधिकरण क्षेत्रातील नदीची लांबी ३५ किमी)

सदरचा प्रकल्प हा महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या National River Conservation Directorate यांचेकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून प्रदूषण नियंत्रण या कामास भांडवली किमतीच्या ६०:४० टक्के या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. उपरोक्त योजनेसाठी प्राधिकरण सभा दि. २४/०९/२०२४ ठराव क्र. ११/१० अन्वये प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे.
दि. २२/०५/२०२५ रोजीचा मा. मुख्य सचिव यांनी घेतलेल्या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार PCMC & PMRDA यांच्या क्षेत्रातून वाहात येणाऱ्या पूर्ण नदीच्या लांबीचा एकत्रित प्रकल्प अहवाल सादर करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार प्रकल्प अहवाल एकत्रितपाने दि. २४/०६/२०२५ रोजी PCMC मार्फत सादर करण्यात आलेला आहे.
सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून यामध्ये M/s. Tandon Urban Solutions Pvt. Ltd. यांना सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. सल्लागारामार्फत प्रकल्प अंमलबजावणीसाठी ठेकेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.











