होळकरवाडी नगर रचना योजना-४
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ने पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील Inner Ring Road विकसित करण्यासाठी होळकरवाडी नगर रचना योजना राबविण्याचे नियोजन केले आहे.
- महानगर प्रदेश आणि नगर रचना अधिनियम, १९६६ (MRTP) च्या कलम ६०(१) अंतर्गत योजना तयार करण्याच्या उद्देशाचे जाहीरनामे १७/१२/२०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे.
- होळकरवाडीचा समावेश PMC हद्दीत करण्यात आला असून त्या क्षेत्रासाठी PMRDA ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- जमिनीच्या मालकांना वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ७७.७० हे. (५०.६६%)
- PMRDA ला वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ४८.९१ हे. (३१.८९%)
- मोकळी मैदाने, उद्याने, तलाव विकासासाठी PMRDA ला वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: १७.२४ हे. (११.२४%)
- सार्वजनिक सुविधा व उपयुक्तता सेवांसाठी वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०७.९५ हे. (०५.१८%)
- PMRDA कडून विक्रीसाठी वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०९.२७ हे. (०६.०५%)
- E.W.S साठी PMRDA ला वितरित केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: १४.४५ हे. (०९.४२%)
- रस्त्याखालील क्षेत्रफळ: २६.७७ हे. (१७.४५%)
- दि. ०३/०७/२०२५ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार प्राथमिक नगर रचना योजना मंजूर केलेली आहे. (प्रसिद्ध दि. जुले १०-१६,२०२५)











