क्रीडा पायाभूत सुविधा
पार्श्वभूमी
शहरीकरण, बदलती जीवनशैली व डिजिटल माध्यमांचा वाढता वापर यामुळे मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. याचा परणाम नागरिकांच्या आरोग्यावर,
विशेषतः बालक व युवकांच्या शारीरिक-मानसिक विकासावर होत आहे. या पार्श्वभूमीवर फुटबॉल व इतर खेळांची सुसज्ज मैदाने विकसित करणे अत्यावश्यक झाले आहे.
खेळांची मैदाने विकसित करण्यामागील उद्दिष्टे
- नागरिकांना सुलभ व सुरक्षित क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे
- बालक व युवकांना मैदानी खेळांकडे प्रोत्साहन देणे
- आरोग्यदायी व सक्रिय जीवनशैलीला चालना देणे
- स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती विकसित करणे
खेळांची मैदाने विकसित केल्याने होणारे फायदे
शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारणा
- नियमित व्यायामामुळे आरोग्य सुधारते
- तणाव, नैराश्य व मानसिक दबाव कमी होतो
बालक व युवकांचा सर्वांगीण विकास
- शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण विकसित होतात
- मोबाईल व व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यास मदत होते
सामाजिक सलोखा व समुदाय बांधणी
- विविध वयोगटांतील नागरिकांमध्ये संवाद वाढतो
- सामाजिक एकोपा व सहकार्याची भावना निर्माण होते
गुन्हेगारी व असामाजिक प्रवृत्तीवर नियंत्रण
- युवकांचा मोकळा वेळ सकारात्मक उपक्रमात जातो
- असामाजिक कृत्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते
क्रीडा गुणवत्ता व स्थानिक खेळाडूंची निर्मिती
- स्थानिक पातळीवर प्रतिभावान खेळाडू घडतात
- जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होतात
रोजगार व आर्थिक संधी
- प्रशिक्षक, देखभाल कर्मचारी, व्यवस्थापन यांना रोजगार
- क्रीडा स्पर्धा व उपक्रमांमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
पर्यावरण व शहरी सौंदर्यवृद्धी
- मोकळी व हरित क्षेत्रे वाढतात
- परिसराचे सौंदर्य व पर्यावरणीय समतोल सुधारतो
शासकीय उपक्रमांशी सुसंगतता
हा उपक्रम Fit India Movement, Khelo India तसेच शाश्वत शहरी विकास धोरणांशी सुसंगत असून सार्वजनिक हिताला प्राधान्य देणारा आहे.
निष्कर्ष
फुटबॉल व इतर खेळांची मैदाने विकसित करणे म्हणजे
आरोग्यदायी समाज, सक्षम युवा पिढी आणि शाश्वत शहरी विकासासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
सेक्टर 3 व 12 मधील PMRDA राखीव भूखंडावर बहुउद्देशीय क्रीडा अरेनाचा विकास.
कामाची व्याप्ती
- फुटबॉल मैदान
- क्रिकेट टर्फ
- स्क्वॉश कोर्ट
- पार्किंग सुविधा
- पॅव्हेलियन/आसनव्यवस्था
- उद्यान/लँडस्केपिंग
कामाचे तपशील
- प्रशासकीय मान्यता खर्च – ₹19.69 कोटी
- तांत्रिक मंजुरी खर्च – ₹19.23 कोटी
- निविदा खर्च – ₹15.68 कोटी
- स्वीकृती पत्र (Letter of Acceptance) – 16/2/2024
- वर्क ऑर्डरची तारीख – 27/02/2024
- प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार – Acotech Consultant Pvt Ltd
- ठेकेदाराचे नाव – M/S B.K. Khose
सेक्टर – ३
- युटिलिटी बिल्डिंग, सिटिंग अरेना व स्क्वॅश कोर्ट रूमची आर.सी.सी. कामे पूर्ण.
- फुटबॉल मैदानाचे टर्फ बसविण्याचे काम पूर्ण.
- अंतर्गत रस्ते व पार्किंगची कामे पूर्ण.
- बैठक /आसन व्यवस्था व स्टील स्ट्रक्चरची कामे पूर्ण.
- संरक्षक भिंत (Compound Wall) व भूमिगत पाणी साठवण (UG Water) संबंधित कामे पूर्ण.
- सर्व आर.सी.सी. घटकांची फिनिशिंग कामे व पेव्हिंग ब्लॉकचे काम प्रगतीपथावर आहे.
- कामाची एकूण भौतिक प्रगती सुमारे ९०% इतकी आहे.
सेक्टर – १२
- रिटेनिंग वॉलचे काम पूर्ण झाले आहे.
- फुटबॉल मैदानाचे काम परफोरेटेड पाईप (Perforated Pipe) टाकण्यापर्यंत पूर्ण झाले आहे.
- युटिलिटी बिल्डिंग व बैठक /आसन व्यवस्था आर.सी.सी. कामे प्रगतीपथावर आहेत.
- भूमिगत पाणी साठवण (UG) संबंधित काम प्रगतीपथावर आहे.
- सदर सेक्टरमधील कामाची एकूण भौतिक प्रगती सुमारे ६०% इतकी आहे.







