औताडे हांडेवाडी नगर रचना योजना-३
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील Inner Ring Road विकसित करण्याच्या उद्देशाने औताडे हांडेवाडी टीपीएस हाती घेण्याचे नियोजन केले आहे.
- योजनेची तयारी करण्याच्या उद्देशाने जाहीरनाम्याची घोषणा महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (एमआरटीपी) च्या कलम ६०(१) अंतर्गत दिनांक १७/१२/२०१८ रोजी करण्यात आली आहे.
- औताडे-हांडेवाडीचा समावेश पीएमसी हद्दीत करण्यात आला असून या परिसरासाठी पीएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- जमीनमालकांना वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ४२.३४ हेक्टर.
- पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: २८.२५ हेक्टर.
- मोकळ्या जागा, उद्यान, तलाव विकासासाठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०६.६२ हेक्टर.
- सार्वजनिक सुविधा व उपयुक्तता यासाठी वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०५.८६ हेक्टर.
- विक्रीसाठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०७.३१ हेक्टर.
- ई.डब्ल्यू.एस. साठी पीएमआरडीएला वाटप केलेल्या अंतिम भूखंडांचे एकूण क्षेत्रफळ: ०८.४६ हेक्टर.
- रस्त्याखालील क्षेत्रफळ: १४.०६ हेक्टर.
- अविकासयोग्य क्षेत्र (नाला): ०४.७५ हेक्टर.
- शासकीय जमीन (विटेवाडी) अंतर्गत क्षेत्रफळ: ०५.०० हेक्टर.
- दि. १८/०६/२०२५ रोजीच्या शासन अधिसूचनेनुसार प्राथमिक नगर रचना योजना मंजूर केलेली आहे. (प्रसिद्ध दि जुलै १७-२३,२०२५)











