दुमजली उड्डाणपूल – पुणे विद्यापीठ
पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम

पार्श्वभूमी
- पुणे विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील जुना उड्डाणपूल विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रोडवरील सर्व वाहतूक सांभाळण्यासाठी अपुरा ठरत होता. एकूण वाहतुकीपैकी केवळ 25% वाहतूकच उड्डाणपुलावरून चालत होती.
- वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि दीर्घकालीन वाहतूक नियोजन सुनिश्चित करण्यासाठी, सरकारने पुणे विद्यापीठ चौक आणि ई-स्क्वेअरसमोरील विद्यमान दोन उड्डाणपूल पाडून त्याठिकाणी मेट्रोसह एकेरी स्तंभांवर एकात्मिक दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- विद्यमान उड्डाणपूल पाडणे आणि दुमजली उड्डाणपूल बांधणे यासाठी मेट्रो सवलतदार कंपनी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांच्यात 26 मे 2020 रोजी करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
- पुणे महानगरपालिकेची मंजुरी घेऊन, वाहतूक अत्यल्प असताना COVID-19 लॉकडाऊनच्या काळात विद्यमान उड्डाणपुलांचे पाडकाम करण्यात आले.
- जुलै ते ऑगस्ट 2020 दरम्यान पाडकाम पूर्ण झाले.
- नव्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचा करार 20 एप्रिल 2022 रोजी साक्षांकित झाला असून नियुक्त दिनांक (25 नोव्हेंबर 2021) पासून एकूण अंदाजित बांधकाम कालावधी 36 महिने आहे.
- प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹277 कोटी असून, किंमतवाढीमुळे अतिरिक्त खर्च लागू शकतो.
एकात्मिक डबल-डेकर उड्डाणपुलाची वैशिष्ट्ये
- एकूण लांबी: 1.70 किमी (रॅम्पसह) आणि व्हायाडक्टची लांबी 1112.52 मीटर.
- वाहतुकीची दिशा:
- औंध आणि बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी दोन-लेन अप-रॅम्प उड्डाणपूल.
- शिवाजीनगरकडून बाणेर व पाषाणकडे तीन-लेन उड्डाणपूल, ज्यास दोन-लेन डाउन-रॅम्प्स असतील.
- औंध, बाणेर व पाषाणकडून सेनापती बापट रस्त्याकडे जाण्यासाठी At grade सुविधा.
- विशेष रचना:
- पुणे विद्यापीठ चौकात वाहतूक प्रवाहाला अडथळा येऊ नये म्हणून 55 मीटर लांबीचा स्टील गर्डर स्पॅन करण्यात आला आहे.
- पुणे महानगरपालिका (PMC) कडून अतिरिक्त कामे:
- शिवाजीनगरहून औंधकडे जाणारा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकपासून राजभवनापर्यंत दोन-लेन, 680 मीटर लांबीचा अंडरपास.
- सेनापती बापट रस्त्याकडून बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उड्डाणपुलाला दोन-लेन रॅम्प जोडण्यात येणार आहे.
मंजुरी स्थिती
- पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने 22 सप्टेंबर 2021 रोजी ठराव क्र. 132 अन्वये उड्डाणपूल प्रकल्पास अंतिम मंजुरी दिली.
- PMC ने शिवाजीनगर–औंध अंडरपास व सेनापती बापट रस्ता उड्डाणपूल जोडण्या यांसह संबंधित प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची बांधिलकी दर्शवली आहे.
वाहतूक व्यवस्थापन उपक्रम
- सर्वसमावेशक वाहतूक पर्यायी आराखडा तयार करून विभागीय आयुक्त आणि पुणे युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (PUMTA) यांच्याकडून मंजूर करण्यात आला.
- विद्यापीठ चौक, पाषाण रोड, अभिमन्यू रोड आणि बाणेर रोड असा वर्तुळाकार वाहतूक मार्ग डिसेंबर 2021 मध्ये अंमलात आणण्यात आला.
- वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी, गणेशखिंड रस्त्यांचे मंजूर विकास ओरराखड्यानुसार ४५ मी मी स्टार रुदाने रुंदीकरण करण्यात येत आहे.
- रस्ता रुंदीकरणामुळे प्रभावित झालेल्या झाडांसाठी पुनर्लागवडीचा आराखडा अंमलात आणण्यात आला.
- वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कृषी महाविद्यालय कॅम्पसमधून पर्यायी रस्ता पूर्ण करण्यात आला.
प्रकल्प प्रगती आणि पूर्णता कालमर्यादा
- मेट्रोसह एकात्मिक डबल-डेकर उड्डाणपुलाचे बांधकाम मूळत: नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध परवानग्या व युटिलिटी-संबंधित अडचणींमुळे प्रकल्पाची कालमर्यादा वाढविण्यात आली आहे.
सद्य पूर्णता स्थिती
-
भौतिक प्रगती: ९०%
-
आर्थिक प्रगती: ७०%
-
नियोजकाचे नाव: पुणे आय टी सिटी मेट्रो रेल लि.
-
ईपीसी कंत्राटदाराचे नाव: मे. टाटा प्रोजेक्ट्स लि.















