रिंग रोड

पुणे आणि महानगरीय प्रदेशातील महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या १२८ किलोमीटर रिंग रोडचं नियोजन पीएमआरडीएनं केलं आहे. हा प्रकल्प पुढील तीन वर्षांत पूर्ण होणार असून, राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकल्पाची ‘महत्त्वाकांक्षी सार्वजनिक वाहतूक प्रकल्प’ म्हणून घोषणा केली आहे. या रिंग रोडच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करण्यासाठी मल्टिलॅटरल/बायलॅटरलसंस्थाना कर्जप्रस्ताव देण्यात आला आहे. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय महामार्ग मंत्री, भारत सरकार यांनी रिंग रोडचा समावेश भारतमाला प्रकल्पात करण्याचे निश्चित केले आहे. रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत सातारा रोड ते नगर रोड या पहिल्या टप्प्यासाठी या पूर्वीच २,४६८ कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहेत.

रिंग रोडसाठी आवश्यक असलेली भू संपादन प्रक्रिया पीएमआरडीच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून शहर नियोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. रिंग रोडमधील महत्त्वाचा भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हायब्रिड अन्युइटी मॉडेल (एचएएम) च्या तत्त्वावर घेतला जाणार आहे.


रिंग रोडची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

कमर्शिअल युटिलिटी जंक्शन्स

स्वयंप्रकाशमान रस्ते

पाच राष्ट्रीय महामार्गांना थेट जोडणार

पूर्ण प्रकल्पाचा खर्च –१७,४१२ कोटी रुपये

महत्त्वाच्या ठिकाणी मेट्रो मार्गिका

रिंग रोडवर येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग


प्रकल्प दस्तऐवज पहा


रिंग रोड नकाशा पहा

Top